उमेश परब, झी मीडिया, सिंधुदूर्ग: सध्या एसटी बसेसचे लहान-सहान अपघात होताना आपण पाहतच असतो. सध्या याच पार्श्वभुमीवर आता अजून एक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. सिंधुदुर्ग (sindhudurg news) परिसरात ही घटना घडली आहे. एस टी बसला आग लागली या अफवेमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आणि दरवाजा खिडकीतून प्रवाशांनी अक्षरक्ष: उड्या मारल्या. कणकवली ते मालवण (kankavali to malvan news) जाणाऱ्या एस.टी. बसमधून अचानक धूर येऊ लागला. हे पाहून कुणीतरी एस.टी.ला आग लागल्‍याची अफवा पसरवली. यामुळे घाबरलेल्‍या प्रवाशांनी एस.टी.च्या दरवाजातून, खिडकीतून,आपत्कालीन दरवाजातून  उड्या मारायला सुरूवात केली. कणकवली तहसील कार्यालयासमोर ही घटना घडली. यावेळी प्रवाशांची धावपळ पाहून तेथे बंदोबस्तासाठी असलेल्‍या पोलिसांनीही घटनास्थळी (fire rumour) धाव घेतली होती. (sindhudurg news kankavali to malvan st bus fire rumour passengers tries to escape)


नक्की काय घडली घटना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कणकवली आगरातून असरोंडी, असगणी मार्गे मालवणला जाणारी एस.टी. बस सायंकाळी पाचच्या सुमारास कणकवली स्थानकातून निघाली होती. ही बस तहसील कार्यालयासमोर आल्‍यानंतर बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्‍यामुळे चालकाने बस थांबवली. यात कुणीतरी प्रवाशाने एस.टी. बसला आग लागली अशी आरोळी ठोकली. त्‍यामुळे घाबरलेल्‍या प्रवाशांनी खिडकीतून, मिळेल तिथून बस बाहेर उड्या मारल्‍या. यावेळी तेथील नागरिकांनीही बसमधील प्रवासी तसेच शाळा, महाविद्यालयातील (college students) विद्यार्थी यांना बस बाहेर काढण्यास मदत केली.मात्र सदरचा धूर हा ऑईलमुळे आल्याचे स्पष्ट झाले.प्रत्यक्षात कोणतीही मोठी आग लागली नव्हती. घटनेनंतर प्रवाशांना अन्य गाडीतून पुढे पाठविण्यात आले.


2017 सालीही मुंबईत एलफिस्टन रोडला (Elphinstone Road Stampade) अशीच घटना घडली होती ज्यात अनेकजणांचा मृत्यू झाला होता. पूल कोसळला अशी अफवा पसरल्यानंतर लोकांची रेल्वेपुलाजवळ चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे अनेकांचे गुदमरून प्राण गेले होते. अनेकदा अशाच घटना अफवांमुळे अपघातांचा कारण बनतात. त्यामुळे अशा गोष्टींमुळे लोकांची तारांबळही उडते.  


एसटीबाबत आता करा थेट आगरप्रमुखाकडे तक्रारी


पिंपरी चिंचवडच्या वल्लभनगर आगारातील आगार प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांचे नंबर सार्वजनिक करण्यात आलेत. प्रवाशांना काही तक्रारी असतील तर आता ते थेट आगार प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांना तक्रार करू शकणार आहेत. एसटीबद्दल किंवा चालक वाहक यांच्या विरोधात तक्रार करायची असल्यास आगारातील लँडलाईन नंबर व्यस्त येत असतो. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, तोच त्रास होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांचेच नंबर सार्वजनिक करण्यात आले आहेत.