आंगणेवाडी यात्रेत विशेष दर्शन रागांची व्यवस्था
लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणा-या आंगणेवाडीची श्री भराडी देवीची यात्रा 27 जानेवारीला संपन्न होणार आहे.
मुंबई : लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणा-या आंगणेवाडीची श्री भराडी देवीची यात्रा 27 जानेवारीला संपन्न होणार आहे.
आणि त्यासाठी पुर्वनियोजनाची लगबग वाढलीय. दर्शनासाठी येणा-या भाविकांना यावर्षी लवकरात लवकर दर्शन मिळावे यासाठी मंडळाने यंदा दर्शन रांगामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचप्रमाणे यंदा आंगणेवाडी जत्रेचे औचित्य साधुन भाविकांसाठी खास राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आलंय.
कोकणची दक्षिण काशी म्हणून आंगणेवाडी यात्रेची महती सर्वदूर आहे. यावर्षीची यात्रा ही 27 जानेवारीला असल्याने आंगणेवाडी कामांची लगबग वाढली आहे. यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. त्यामुळे दर्शनासाठी काही वेळा आठ तासांपेक्षाही जास्त वेळ लागतो. भक्तांची ही अडचण लक्षात घेऊन मंडळाने खास जादा रांगाची व्यवस्था केलीय. साहजिकच यंदा एका तासात भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतील.
आंगणेवाडीत यावर्षी प्रथमच राज्य सरकारने कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. राज्यातील, विविध ठिकाणचे शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होणार आहे. साडे पाच एकर परिसरात हे प्रदर्शन आयोजित केल जाणार आहे. यात्रेला आता अवघे पंधरा दिवस राहिल्याने यात्रेच्या तयारीला वेग आलाय तर चाकरमानीही सध्या बुकिंग करण्याच्या तयारीत आहेत. एकूणच दरवर्षी प्रमाणेच यावर्षी हि यात्र्त उपस्थितीचा उच्चांक होईल हे मात्र नक्की