अहमदनगर : हभप इंदुरीकर महाराज यांच्या समर्थकांचं सोशल मीडियावर वादळ आलं आहे. इंदुरीकर यांच्या नावामुळे आपलीही प्रसिद्धी होईल, यामुळे इंदुरीकरांवर टीका करणारे पुढे येत असल्याचा आरोपही इंदुरीकर समर्थकांकडून केला जात आहे. तर इंदुरीकर महाराजांवर सिंधुताई सपकाळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदुरीकर हे चांगले व्यक्ती आहेत. बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून बोललं गलं असेल असं मत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळांनी व्यक्त केलं आहे.  तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांचं समर्थन केलं आहे. दोन तासांच्या कीर्तनातून एखादा शब्द चुकीचा  जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. समर्थकांप्रमाणेच बच्चू कडूंनी देखील इंदुरीकर महाराजांच समर्थन केलं आहे.  


इंदुरीकरांनी सम-विषम वादावर अस्त्र काढलं आहे. इंदुरीकरांनी वादावर भूमिका घेताना म्हटलं आहे. आता याविषयी काहीही बोलणार नाही. एकंदरीत इंदुरीकरांनी आता मौन अस्त्र संपूर्ण वादावर वापरलं आहे. यामुळे इंदुरीकरांनी कोणतंही भाष्य वादावर न केल्याने, इंदुरीकर विरोधकांची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. इंदुरीकरांनी आपल्या ठरलेल्या तारखांप्रमाणे कीर्तन करण्याचा धडाका चालूच ठेवला आहे.



इंदुरीकरांनी आपल्या समर्थकांनी लेखी आवाहन केलं आहे. चलो नगर म्हणत मोर्चा काढू नका, गर्दी जमवू नका, कायदा व सुव्यवस्था राखा, असं आवाहन इंदुरीकरांनी समर्थकांना केलं आहे.