Singapore Village Maharashtra : लाल परी अर्थात एसटी बस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. मात्र, महाराष्ट्रातून थेट सिंगापूरला जाणारी एसटी बस मिळते असं कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण खरचं आपल्या महाराष्ट्रातून थेट सिंगापूरला जाणारी एसटी मिळते. पण हे सिंगापूर म्हणजे खरोखरचा देश नाही तर आपल्या महाराष्ट्रातील एक छोटसं खेडेगाव आहे. अनोख्या नावामुळे चर्चेत असलेले सिंगापूर हे गाव खूपच निसर्गरम्य आहे. सिंगापूर हे महाराष्ट्रातील छुप हिलस्टेशन आहे. यामुळे वन पिकनीक करायची असेल तर तुम्ही सिंगापूरला फिरायला जायचा प्लान करु शकता.


हे देखील वाचा.. मुंबईत समुद्राच्या मध्यभागी असलेली 600 वर्ष जुनी चमत्कारिक वास्तू; फक्त भारतातच नाही सपूर्ण जगात प्रसिद्ध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंगापूर हा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओखळला जातो. मात्र, आपल्या महाराष्ट्रातील सिंगापूर खूपच गरीब आहे. मुरबाड तालुक्यातील सह्य़ाद्रीच्या डोंगररागांमध्ये घनदाट जंगल आहे. याच सह्य़ाद्रीच्या डोंगररागांमध्ये माळशेज, नाणे आणि दाऱ्या हे तीन प्राचीन घाटमार्ग आहेत. यापैकी माळशेज घाटात राष्ट्रीय महामार्ग आहे. उर्वरित दोन घाटांमधून मात्र अजूनही पूर्वापार पायवाटा आहेत. या घाटातील पायवाटा पुणे जिल्ह्य़ाला जोडल्या जातात. या डोंगररागांचा अर्धा भाग ठाणे जिल्ह्य़ात तर अर्धा पुणे जिल्ह्य़ात येतो. हे घाट कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बॉर्डर म्हणून देखील ओळखल्या जातात. याच घाटात सिंगापूर हे गाव आहे. 


हे देखील वाचा... रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवार


सिंगापूर हे माथेरान आणि महाबळेश्वरप्रमाणे डोंगरमाथ्यावरचे एक थंड हवेचे ठिकाण आहे. या परिसराचे निसर्गसौंदर्य पाहून मन प्रसन्न होते. माळशेजला पर्यटकांची गर्दी असते. मात्र, फारचं कमी लोकांना सिंगापूर बद्दल माहिती आहे. सिंगापूरच्या कोळेवाडीत शिरले की समोर क्षितिजावर नाणे आणि दाऱ्या या दोन घाटांचे सुळके डोक्यावर मुकुट असल्याप्रमाणे भासतात. दाऱ्या घाटाच्या माथ्यावरील डोंगररागांमध्ये उगम पावणारी कनकवीरा नदी नागमोडी वळणे घेत याच भागातून वाहते. याच डोंगररांगांमध्ये बारमाही वाहणारे जिवंत जलस्रोत आहेत. यामुळे सिंगापूर गावात अनेक झरे आणि धबधबे पहायला मिळतात. ट्रेकींगसाठी सिंगापूर हा उत्तम पर्याय आहे.  शेती आणि पशुपालन या गावातील लोकांचे उपजीवीकेचे मुख्य साधन आहे. या गावात मुक्काक करायचा म्हंटल तर तशी निवासाची सोय नाही. मात्र, अलिकडेच ग्रामस्थांनाी पर्यटनाला चालना देण्यासाठी होमस्टे सारख्या सुविधा सुरु केल्या आहेत.