मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर : सोशल मीडिया माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवतो, आणि त्यातल्या त्यात जर आपण कलाकार असाल गायक असाल तर आपल्या कलागुणांची वाहवा साता समुद्रापार देखील होऊ शकते. हाच अनुभव नगरची सोशल मीडियातून पुढे आलेली गायिका अंजली गायकवाड हिला आलाय.  


सोशल मीडियाद्वारे सातासमुद्रापार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी युवा प्रस्तुत संगीत सम्राट विजेती आणि झी टीव्हीच्या सारेगमप लिटल चॅम्प्स स्पर्धेतील संयुक्त विजेती असलेली अहमदनगरची सुपरस्टार गायिका अंजली गायकवाड हिची कला सोशल मीडियाद्वारे सातासमुद्रापार पोहोचलीय. युट्यूबवर तिच्या व्हिडीओला कोट्यावधी व्ह्यूज मिळत आहेत. तिच्या गाण्यावर प्रेम करणारे रसिक साता समुद्रापार देखील आहेत . याची प्रचीती नगरकरांना आणि गायकवाड परिवाराला पुन्हा एकदा आली. अमेरिकेत स्थायिक असलेल्या अनुपमा हळदणकर यांनी तिचे गाणे युट्यूबवर ऐकले आणि त्या तिच्या गायकीवर अक्षरश फिदा झाल्या. अंजलीला भेटण्यासाठी त्या नगरमध्ये आल्या. चार दिवस त्या नगरमध्ये अंजलीसोबत राहिल्या. त्याच काळात अंजलीचा वाढदिवस देखील होता. वाढदिवसानिमित्त अनुपमा हळदणकर यांनी तिची एक मैफल आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. 


अंजलीला १ लाखांची मदत


अहमदनगरच्या यश ग्रांड हॉटेल मध्ये हा सोळा पडला. अंजल, नंदिनी आणि अंगद गायकवाड यांनी आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. अनुपमा हळदणकर यांनी तिला 1 लाख रुपयांची मदत दिलीय आणि तिचा कार्यक्रम अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळात आयोजित करण्याचे आश्वासन दिले. 


ए.आर.रेहमानही प्रभावित


अंजलीचे सोशल मीडियावरील गाणे ऐकून जगप्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान देखील प्रभावित झाले होते. त्यांनी तिला सचिन तेंडुलकर द मिलेनियर या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी देखील दिली. सोशल मीडियामुळेच अंजलीसारखी सिक्रेट सुपरस्टार जगाला माहित झालीय.