सिंहगडचा रस्ता बंद असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड
पुण्यातील सिंहगडचा घाट रस्ता सलग दोन आठवडे बंद असल्याने गडावर येणा-या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
पुणे : पुण्यातील सिंहगडचा घाट रस्ता सलग दोन आठवडे बंद असल्याने गडावर येणा-या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. दरड कोसळल्याच्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता ३० जुलैपासून बंद आहे. दरम्यानच्या काळात रस्त्यावर कोसळलेला राडा-रोजा बाजूला काढण्यात आलाय. त्याचप्रमाणे धोकादायक दरडी काढण्यात आल्यात. मात्र जिल्हा प्रशासनाकडून रस्त्याची सुरक्षा तपासणी होणं बाकी आहे. त्यामुळे हा रस्ता अजूनही बंद आहे.
विकेन्डच्या दिवशी गडावर येणा-या पर्यटकांची संख्या मोठी असते. मात्र रस्ता बंद असल्याने पर्यटकांना आल्या मार्गी परत जावं लागतंय. त्यामुळे पर्यटक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये अकारण वाद उद्भवत आहे. येत्या मंगळवारी १५ ऑगस्ट आहे. त्यादिवशी गडावर मोठी गर्दी होण्याची शक्यता पाहता प्रशासनाने हा घाटरस्ता लवकर सुरू करावा अशी मागणी होत आहे.