मुंबई : देशात कोरोना संक्रमण वेगाने पसरत चालले आहे. सर्व राज्यांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालीय. पण लसीकरणासाठी नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून लसीकरणाचा तुटवडा जाणवतोय. आपल्याकडे आधी लस पोहोचली पाहीजे असे प्रत्येक राज्याला, शहराला वाटते. यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जातायत. दरम्यान कोव्हीशील्ड लसींची निर्मिती करणाऱ्या अदर पुनावाला यांना धमक्यांचे फोन येऊ लागलेयत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी अदर पुनावाला हे लंडनला गेले आहेत. मला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मोठ्या नेत्यांचे फोन येतात. प्रत्येकाला लस तात्काळ हवी अशी मागणी असते. यासाठी अनेकजण आक्रमक स्वरुपात बोलतात असे पुनावाला यांनी म्हटले. 


सीरम इन्स्टिट्युटवर लसीकरण उत्पादन वाढवण्यासाठी सध्या प्रचंड ताण आहे. दरम्यान कोव्हीशील्ड तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी आपल्याला धमक्यांचे फोन आल्याचे पुनावाला यांनी सांगितले. द टाइम्स' या लंडनमधील वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी अदर पूनावाला यांनी धमकीच्या फोन कॉल्सबद्दल सांगितले. 



प्रत्येक नागरिकाला लस तातडीने हवी आहे. मात्र इतर कोणी आपल्याही आधी त्यांना लस पुरवू शकतो का ? हा देखील त्यांनी विचार करावा असे अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. लस उत्पादन इतर देशांमध्ये विस्तरण्याचा प्रयत्न असल्याचे पुनावाला म्हणाले.


पुण्यातील कोविशिल्डचे उत्पादन वेगाने होतंय. काही दिवसांनी परत येऊन याची समिक्षा करेन अशी माहिती पुनावाला यांनी ट्वीट करत दिली.


पुनावाला यांना सुरक्षा 


गृह मंत्रालयाने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदार पूनावाला यांना वाय श्रेणी (Y Category) संरक्षण दिलं आहे. गृह मंत्रालयाकडून या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. अदार पूनावाला यांना सीआरपीएफ संरक्षण देण्यात आलं आहे.



केंद्र सरकारने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सीरम इंस्टिट्यूट सध्या भारतात कोरोनावरील वॅक्सीन पुरवत आहे. इतकंच नाही तर संपूर्ण जगात सीरमकडून वॅक्सीन पूरवली जात आहे. 


सायरस पूनावाला यांचा मुलगा अदार यांनी परदेशात शिक्षण पूर्ण केलं. भारतात आल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत काम करायला सुरुवात केली. सीरम इंस्‍टीट्यूट ऑफ इंडियाच्या यशात अदार पूनावाला यांची महत्त्वाची भूमिका आहे. आज भारताच्या दिग्‍गज व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. महाराष्‍ट्रातील पुणे या ठिकाणी सीरम इंस्‍टीट्यूट ऑफ इंडियाचा जवळपास 100 एकर मध्ये कॅम्पस पसरला आहे.