गजानन देशमुख /झी मीडिया, परभणी : Sister dies of heart attack after brothers death : एक धक्कादायक बातमी. भावाचे दीर्घ आजाराने निधन झाले. मात्र, याचा मोठा आघात बहिणीला झाला. भावाच्या निधनाची बातमी समजताच बहिणीला  हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर बहिणीचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेकांना धक्का बसला. परिसरात शोककळा पसरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पूर्णा शहरातील जैस्वाल परिवारात सुनील नारायणप्रसाद  जयस्वाल (59)  यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. भावाच्या निधनाची बातमी समजताच औरंगाबादवरुन आलेल्या बहिणीचा  हृदयविकाराने मृत्यू झाला. बहीण - भावांच्या निधनामुळे जैस्वाल परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला.


 सुनील  जयस्वाल यांचे दीर्घ आजाराने रविवारी सायंकाळी निधन झाले. सोमवारी सकाळी 11 वाजता सुनील जैस्वाल यांच्या पार्थिवावर पूर्णा शहरातील समशानभूमीत रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी सुनील यांची मोठी बहीण सुनीता विजयकुमार जैस्वाल (65) औरंगाबादवरुन सकाळी पूर्णा येथे अंत्यसंस्कारसाठी आल्या होत्या. लहान भावाच्या निधनाची बातमीने त्यांना धक्का बसला. भावाला पाहून त्यांना रडू कोसळले आणि त्यांची एकदम दातखिळी बसली. त्यांना उपस्थितांनी तात्काळ खासगी दवाखान्यात दाखल केले.


डॉक्टरांनी सुनीता यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू  झाल्याचे सांगितले. काही तासांच्या फरकाने बहीण भावांचा मृत्यू झाल्याने जैस्वाल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर सायंकाळी बहीण सुनीता विजयकुमार जैस्वाल यांच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनाच्या दुहेरी घटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.