Parbhani Crime News : महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने घडतच आहेत. अशातच परभणीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.  बहिणीची छेड काढणाऱ्या नराधमाला तिच्या भावांनीच भयानक शिक्षा दिली आहे. बहिणीची छेड काढल्याचा राग मनात धरून तिघा भावांनी छेड काढणाऱ्याचा व्यक्तीचा काटा काढला. पालम तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीच्या पालम तालुक्यातील वानवाडीत ही घटना घटना घडली आहे. बहिणीची छेड काढल्याच्या राग मनात धरून तिघा भावांनी आरोपीवर धारदार शस्त्राचे घाव घालून त्याची हत्या केली आहे.  मृत व्यक्तीच्या गुप्तांगावर देखील वार करण्यात आले आहेत. मृत व्यक्तीच्या आईने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी  गुप्तांगावर वार केल्याचे म्हंटले आहे. 


या प्रकरणी आरोपी सोमनाथ राजेभाऊ वाडीकर, रामेश्वर उर्फ बबलू राजेभाऊ वाडीकर, नागेश संजय वाडीकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालम पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.


अखेर नऊ वर्षानंतर सोनी हत्याकांडातील सातही आरोपींना जन्मठेप


भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठीत सराफा व्यापारी संजय सोनी त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा ध्रुवील या तिघांचा 26 फेब्रुवारी 2014 रोजी मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातून 8.3 किलो सोने, 345 ग्रॅम चांदी आणि 39 लाख रुपये रोख असे साडेतीन कोटींचा ऐवज पळविला होता. त्यानंतर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली होती. यातील चार आरोपींना तुमसरातून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एक आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती.


आरोपींमध्ये शाहनवाज ऊर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, केसरी ढोले रा.तुमसर, सोहेल शेख , रफीक शेख रा.नागपूर यांचा समावेश आहे. तुमसर पोलिसांनी या प्रकरणात 800 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. पोलिसांना याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले होते. अतिशय थंड डोक्याने षडयंत्र करून हत्या करणाऱ्या या सातही नराधमांना जिल्हा सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणांमध्ये कोणीही प्रत्यक्षदर्शी नसतानाही पोलिसांनी केलेल्या योग्य तपासामुळे आणि त्यांनी दिलेल्या पुराव्यामुळे हत्याकांडातील या सातही आरोपीवर अपराध सिद्ध करणे शक्य झाले असल्याचे उज्वल निकम यांनी म्हटले आहे.