बारामती : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आज वाढदिवस होता. अजित पवार यांच्या वाढदिवसाला त्यांच्या बहिणींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. सुप्रिया सुळे यांनी याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात अजितदादांना भेटून देऊ शकलो नाही, त्यामुळे आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा आधार घेतल्याचं सुप्रिया सुळे या ट्विटमध्ये म्हणाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुप्रिया सुळे, प्रफुल्ला भोसले, रजनी इंदूलकर, विजया पाटील, निमा माने, निता पाटील, शमा पवार आणि अश्विनी पवार उपस्थित होत्या.



अजित पवारांबरोबरच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही आज वाढदिवस आहे. अजित पवारांनी ट्विटरवरून फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांनीही मग लगेचच अजितदादांच्या ट्विटला रिप्लाय देत त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



कोरोनाच्या संकटात वाढदिवस साजरा करू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले होते. कार्यकर्त्यांनी कोणतेही कार्यक्रम, भेटीगाठी न करता, त्याऐवजी कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांची मदत करावी, असे आदेश अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले होते. तर देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिराती, होर्डिंग, उत्सव याऐवजी सेवाकार्यात जास्तीत जास्त योगदान द्यावे, असं भाजपने कार्यकर्त्यांना सांगितलं.