अहमदनगर : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले आहे. त्यांना १८ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तर एकाला निर्दोष सोडण्यात आलं आहे. 


काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील सोनई येथे ३ जानेवारी २०१३ रोजी ३ जणांची निर्घूण हत्या करण्यात आली होती. आता या संदर्भात प्रथम २ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तपास करुन ३ आरोपींना अश्या एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली होती. 


५ आरोपींना अटक करण्यात आली होती


सोनईतील गणेशवाडी येथे असेलेल्या दरंदले वस्तीत राहणा-या ३ सफाई कामगारांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांना १ मृतदेह सेफ्टी टँक मध्ये तर २ मृतदेह विहीरीत आढळून आले होते. या संदर्भात प्रथम २ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तपास करुन ३ आरोपींना अश्या एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान याबाबतचे खटला नाशिक येथे सुरु असुन आज सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे.