मुंबई : गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला मात्र अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं. यंदा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि पावसाबाबत महत्त्वाची बातमी आहे. यंदा पाऊस कसा राहील, याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कायमेटनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2022 मध्ये भारतात मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस राहणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.



गेल्या दोन वर्षांतल्या पावसावर अल निनो या वादळाचा परिणाम होता. पण यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा तेवढा परिणाम राहणार नाही. तसंच प्रशांत महासागरातही मान्सूनला अडथळा ठरणारं वातावरण तयार झालं होतं, त्याची तीव्रताही हळूहळू निवळते आहे त्यामुळे यंदा पाऊस सामान्य असणार आहे. 


एप्रिल महिन्यात मान्सून संदर्भात अधिक सविस्तर रिपोर्ट देण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं. मान्सूनमध्ये अजूनतरी कोणतेही अडथळे दिसत नाही असं म्हटलं आहे. मान्सूनचा प्रवास कसा असेल आणि कधी सुरू होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच येईल असंही त्यांनी सांगितलं.