यवतमाळ : मूर्ती लहान पण किर्ती महान, या ओळी आपण अनेकदा ऐकल्या असतील. सध्या ही ओळ एका लहानग्याच्या कृतीसाठी सार्थ ठरत आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे. यवतमाळच्या लोनबेहळ गावात सध्या याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांचं दारुचं व्यसन सोडवण्यासाठी या चिमुकल्यानं चक्क ग्रामसभा गाजवलीये. 



अंकुश आडे नावाचा हा मुलगा भाजीपाला विकतो. भाजीपाला विकताना तो दारुचे दुष्परिणाम लोकांना पटवून देतो. 


लेकाची ही जिद्द पाहून गावकऱ्यांनी त्याला वडिलांसह ग्रामसभेत बोलवून घेतलं आणि तिथे त्याच्या वडिलांना दारु सोडण्याची तंबी दिली. 


मुख्य म्हणजे या सर्व प्रकारानंतर अंकुशच्या वडिलांनीही आपण दारु सोडत असल्याचं जाहीर केलं. 


'ग्रामसेवक आणि सरपंचांनी आपल्या मुलाची हुशारी बघत आपल्याला दारु सोडण्यास सांगितलं. मीसुद्धा मुलाचं कौतुक पाहत त्या क्षणी दारु सोडली', असं अंकुशचे बाबा माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 


एका चिमुरड्यानं जवळपास अशक्य गोष्टच शक्य करुन दाखवली.


इतक्या कमी वयात त्याला असणारी समज पाहता त्याच्या या कृतीवर सध्या गावागावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


मुख्य म्हणजे इतक्या कमी वयात त्याला आलेली समज आणि स्वत:च्याच कुटुंबासाठी त्यानं केलेली ही मेहनत पाहता येत्या काही वर्षांमध्ये तो शिकून मोठ्या हुद्द्यावर दिसला तर नवल वाटायला नको.