मुंबई : काही माणसं, काही ठिकाणं अशी असतात ज्यांना प्रसिद्धीसाठी कोणत्याही माध्यमाची गरज नसते. त्यांचं कार्यच सर्वकाही साध्य करुन जातं. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचंही अगदी तसंच. महाराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगात एक वेगळीच उर्जा संचारते. त्यातही कानांवर शिवगर्जना पडली तर मग काय सांगावं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अशीच एक शिवगर्जना प्रत्येकाच्या नजरेस आणि कानांवर पडत आहे. 


एक चिमुरडी, मोठ्या आदरानं आसमंताकडे आणि गडाच्या दाराकडे नजर रोखून महाराजांचा जयघोष करताना दिसत आहे. 


अनेकांनीच हा व्हिडीओ स्टेटसपासून ते अगदी सोशल मीडियावर पोस्ट लिहितही शेअर केला आहे. 


वयानं लहान असली तरीही नजरेत तळपती तलवार आणि प्रचंड आत्मविश्वास या मुलीचं वेगळेपण सिद्ध करत आहे. 


शिवगर्जनेतील शब्दन्-शब्द ती मोठ्या ताकदीनं आणि तितक्याच आदरानं उच्चारताना दिसत आहे. 


तिच्या आवाजात एकिकडे आपुलकी झळकत आहे, तर दुसरीकडे कणखरपणा. 


अतिशय कमी वयात तिला उमगलेली महाराजांची महती, म्हणजे जणू आई भवानीचा आशीर्वादच. 


व्हिडीओ नेमका कुठला? 
सूत्रांच्या महितीनुसार व्हायरल होणारा हा व्हिडीओ जीवधन किलल्यावरील असल्याचं सांगण्यात येत आहे. 


स्वराज्याचे प्रवेशद्वार दुर्गार्पण सोहळ्यातील हे क्षण असल्याचं सोशल मीडियावरून कळत आहे. 


देवांशी असं या चिमुकलीचं नाव. तिच्या व्हिडीओला आतापर्यंत असंख्य लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत. मुख्य म्हणजे या आकड्यांपेक्षाही तिची आत्मियता आणि समर्पकताच सर्वात सरस 
ठरत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 



पाहा एका श्वासात तुम्हाला जमतेय का ही शिवगर्जना... 


गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की...... जय!!!