कोल्हापूर : कोल्हापूरातून एक विचित्र बातमी समोर येतय.  एका अज्ञात शेतक-यानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या आवाहनानंतर या शेतक-यानं हे पाऊल उचललं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोल्हापुरात शेतीला रात्री वीज पुरवठा केला जातो. अशावेळी शेताला पाणी देताना साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर यांसारखे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता जिल्हाधिकारी तसंच तालुक्यातील सरकारी कार्यालयात  सोडा असं आवाहन राजू शेट्टींनी केलं होतं. 


राजू शेट्टींच्या या व्यक्तव्याला खरंच प्रतिसाद देत, एका शेतक-याने जीवंत साप जिल्हाधिकारी कार्यालयात सोडला. 


शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी स्वाभीमानीनं आंदोलन केलं मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय..