एसएनडीच्या ९ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात...
मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ म्हणजेच एसएनडीटी विद्यापीठाच्या सहा राज्यातील सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचे आदेश युजीसीने दिले आहेत. राज्यातील विद्यापीठातील उच्च शिक्षणाची फ्रेंचायाजी परराज्यात देता येत नाही हा नियम लावण्यात आला आहे.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ म्हणजेच एसएनडीटी विद्यापीठाच्या सहा राज्यातील सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचे आदेश युजीसीने दिले आहेत. राज्यातील विद्यापीठातील उच्च शिक्षणाची फ्रेंचायाजी परराज्यात देता येत नाही हा नियम लावण्यात आला आहे.
कोणत्या राज्यात आहे शाखा...
या विद्यापीठाची कार्यकक्षा केवळ महाराष्ट्रात असताना राज्याबाहेरील बिहार, गुजरात, उत्तर परदेश ,आसाम, गोवा, मध्यप्रदेशात सुरु आहेत.
२०१३ मध्ये दिली होती नोटीस...
या विद्यापीठाला २०१३ साली नोटीस देऊनही विद्यापीठाने आपले कॉलेजेस सुरु ठेवली आहेत या पार्श्वभूमीवर यूजीसीने एका महिन्याच्या आत हे सर्व कोर्सेस बंद करण्याचे आदेश देत याबद्दलची पूर्तता युजीसीकड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नऊ लाख विद्यार्थ्यांना फटका...
यामुळे या राज्यातील बीएड एमएड कॉमर्स सायन्स अशा अनेक पदव्या बंद करण्यात आल्याने या राज्यातील नऊ लाख विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.