प्रणव पोळेकर, झी मीडिया, संगमेश्वर-रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील सोनगीरी टाकळेवाडीत, गेले १३ दिवस घरातील कपडे आणि अन्य वस्तु घरातील माणसे आजूबाजूला वावरत असताना अचानकपणे पेट घेण्याचा प्रकार घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुभाष यशवंत टाकळे यांच्या घरात हा सगळा प्रकार घडत असुन या प्रकाराने टाकळे कुटुंबियांसह सोनगिरी परिसरात मोठी खळबळ उडालीय...


संगमेश्वर जवळच्या सोनगिरी टाकळेवाडीत रहाणारं सुभाष यशवंत टाकळे यांचं कुटुंब सध्या दहशतीखाली जगतंय.. टाकळे यांच्या घरामध्ये 13 दिवसात 11 वेळा वेगवेगळ्या वस्तुंनी पेट घेतलाय...कधी टाकळे यांच्या घरातील पांघरूण जळतात, कधी घरातील टीव्ही, पंखा जळतो तर कधी घरात ठेवलेले अंगावरचे कपडे जळून खाक होतात...या सगळ्या प्रकारामुळे सध्या टाकळे कुटुंबीय घाबरुन गेलेत..


आतापर्यंत टाकळे यांच्या घरातील गाद्या, कपाटातील कपडे, टीव्ही, पंखा  जळून गेलेत.. रोजआगीच्या घटना घडत असताना एकदातर टाकळेंची सून दारात उभी असताना तिच्या अंगावरील गाऊन अचानक पेटला... यानंतर घराबाहेर वाळत घातलेले कपडे जळलेल्या स्थितीत आढळले मात्र बाजूच्या घरातील माणसांचे कपडे व्यवस्थित होते...


अंनिसनंही या साऱ्या प्रकरणाची पहाणी केली. घरातीलच एखादा व्यक्तीचा यात सहभागी असल्याचा दावा अंनिसन केलाय.


या सगळ्या प्रकारानंतर काही प्रश्न मात्र अनुतरितच राहतात ते म्हणजे, टाकळे यांच्या सुनेला आणि मुलालाच ही आग कशी दिसते. कुटुंबातील सर्व सदस्य घरात असताना आग लागत नाही. त्यामुळे टाकळेंच्या घरातील घटना ही मानवनिर्मीतच आहे यात शंका नाही.