धनंजय मुंडेंची जवानाला अशी मदत
सोशल मीडियावर प्रचंड चर्चा
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे राजकीय वर्तुळात कायमच चर्चेत असतात. पण आता त्यांच्या एका कृतीमुळे ते सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहेत. त्याला कारण देखील तसंच काहीसं आहे. धनजंय मुंडे यांनी एका जवानाला मदत केली आहे.
सुट्टी संपवून देशसेवेसाठी निघालेल्या परळीतील वैभव मुंडे या जवानाचं विमान हुकलं. त्यामुळे चिंतेत असलेल्या या जवानाच्या मदतीचा धनंजय मुंडे धावून आले.याची पोस्ट धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्यांच सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत आहे.
सुट्टी संपवून देशसेवेसाठी निघालेल्या परळीतील पांगरी येथील बीएसएफ जवान वैभव मुंडे यांची औरंगाबादला येणारी रेल्वे लेट झाल्याने श्रीनगरला जाणारे विमान हुकले. कारवाईच्या भीतीने चिंताग्रस्त वैभव यांचे विमान तिकीट काढून दिले. देशरक्षणास तत्पर सैनिकाला मदत करणे हे माझे परम कर्तव्य आहे, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
श्रीनगर येथे रूजू होण्यासाठी जवान वैभव मुंडे औरंगाबादहून श्रीनगरला विमानाने जाणार होते. पण परळीहून रेल्वेने औरंगाबादला यायला उशीर झाल्याने त्यांच विमान चुकलं. वेळेवर बीएसएफ मुख्यालयात पोहोचलो नाही तर कारवाईचा सामना करावा लागेल? या चिंतेत वैभव विमानतळावर बसले होते. याचवेळी आपला दोन दिवसांचा बीड दौरा संपवून धनंजय मुंडे मुंबईला रवाना होण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते.
तेव्हा त्यांच लक्ष बीएसएफ जवान वैभव मुंडेंकडे गेले. निराश बसलेल्या जवानाची चौकशी केल्यावर सगळा प्रकार कळला. तेव्हा धनंजय मुंडेंनी तात्काळ आपल्या मुंबईतील कार्यालयामार्फत सुत्रे हलवली आणि वैभव यांच्याकरता एअर इंडियाच्या विमानाचे औरंगाबादहून दिल्ली-श्रीनगर असं तिकिट काढून दिलं.