प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्याचे व्हॉटसअपवरील ‘ते’ परिपत्रक खोटं
सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्या,
सोलापूर : सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्या, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा संदेश आणि परिपत्रक खोटे आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांकडून करण्यात आले आहे.
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलली आहे, अशा आशयाचे कार्यालयीन परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे परिपत्रक हे खोटे आहे. विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे पूर्वघोषित वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांची लेखी आणि तोंडी परीक्षा विहित वेळेनुसारच घेण्यात येणार आहेत, असे देखील अधिष्ठात्यांनी कळविले आहे.