साखरेला ३० रुपये किलोचा हमी भाव? सोलापुरात ऊस शेतकरी संकटात
सोलापुरातील ३० साखर कारखान्यांनी यावेळेस १ कोटी ६९ लाख टन गाळप केलाय
सोलापूर : राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यात गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरीही अद्याप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारनं ठरवलेल्या एफआरपीप्रमाणे पहिला हप्ताही दिला नाही. शेतकऱ्यांनी या ऊसाची लागवड करताना केलेला कर्जाचा बोझा वाढत होता. सरकारनं केलेल्या कर्ज मुक्तीचा लाभही शेतकऱ्यांना घेता येत नाही. ऊस आले की, दीड लाखाच्या पुढची रक्कम भरून कर्ज मुक्तीची आशाही मावळात चाललीय. दरम्यान, साखरेला ३० रुपये किलोचा हमी भाव देण्याचा विचार केंद्र सरकारनं सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
सोलापुरातील ३० साखर कारखान्यांनी यावेळेस १ कोटी ६९ लाख टन गाळप केलाय. कायद्यानुसार एफआरपीच्या कायद्यानुसार १४ ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे लागतात. तीन महिने उलटूनही ३० पैकी २८ कारखान्यांनी अद्याप बिलाचा पहिला हप्ताही दिला नाही. यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानानं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं.
दरम्यान, राज्यातल्या साखर उद्योगासाठी येत्या काही दिवसात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यताय. साखरेला ३० रुपये किलोचा हमी भाव देण्याचा विचार केंद्र सरकारनं सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सध्या साखरेच्या घाऊक बाजारात याच माहितीच्या आधारे काल जोरदार खरेदी सुरू झाली असून काल बाजार भाव क्विंटल मागे २०० रुपयांनी वर गेले.