सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारावर अखेर शिक्कामोर्तब
सोलापूर विद्यापीठाचा अखेर नामविस्तार हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा करण्याच्या निर्णयावर, राज्य सरकारनं शिक्कामोर्तब केलं आहे.
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा अखेर नामविस्तार हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा करण्याच्या निर्णयावर, राज्य सरकारनं शिक्कामोर्तब केलं आहे. या विषयाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीचे प्रमुख मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत ही माहिती दिली. येत्या ३१ डिसेंबरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून, सोलापूर विद्यापीठ नामविस्तारचा सोहळा आयोजित केला जाणार आहे.
हा नामविस्तार करताना वीरशैव लिंगायत समाजाच्या पाच प्रमुख मागण्याही राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. त्याचाही पाठपुरावा केला जाणार आहे. दरम्यान लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग मोकळा असल्याची प्रतिक्रिया, शिवा संघटनेने दिलीय.