प्रथमेश तावडे / वसई : Solar car : सध्या पेट्रोल-डिझेलने शंभरी ओलांडली आहे. अनेक जण इलेक्ट्रीक गाड्या घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. आता पेट्रोल-डिझेलला बाय-बाय करता येणार आहे. कारण वसईतील इंजिनिअर तरुणांनी बनवली सोलार कार. (Solar car made by students from Vasai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 वसईतील वर्तक अभीयांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सौर उर्जेवर चालणारी कार बनवली असून तिचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. सध्या वाढत्या इंधनाच्या किमती आणि पर्यावरणाचा वाढता धोका पाहता वसईतील तरुणांनी बनबिलेली ही सोलार कार सर्वांचे लक्ष वेधत आहे.



वसईतील वर्तक अभियांत्रिकी महाविद्यालयातील शाखेसह मॅकेनिकल, आय टी, संगणक विभागातील 40 मुलांनी ही कार बनवली आहे. त्यांनी शैक्षणिक प्रकल्प म्हणून 2017पासून ही कार बनविण्यास सुरुवात केली होती. तीन चाके असलेली ही कार असून तासी 65 किमी वेगाने धावू शकते. त्याचबरोबर एकदा चार्ज केल्यावर किमान 125 किमी प्रवास करता येणार आहे. 



सध्या ही कार रस्त्यावर आली नसली तरी भविष्यातील इंधन पर्याय म्हणून याकडे पहिले जात आहे.ही कार पूर्णतः विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात बनवली आहे. यासाठी 3 वर्षे लागले असून 4 लाख रुपये इतका खर्च आला आहे, अशी माहिती विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राध्यापक दीपक चौधरी आणि कार तयार करणाऱ्या सदस्य मनीषा बुसवा यांनी दिली.