अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्याकरता राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न होत असतानाच, नागपुरातील एका महाविद्यालयाने सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयाने सौर उर्जेच्या संयंत्राची स्थापना करत ४० किलो वॉट वीजेच्या निर्मितीची व्यवस्था केली आहे. या यापैकी महाविद्यालयाची गरज ३२ किलो वॉटची असल्याने महाविद्यालय उर्वरित वीज राज्य सरकारला विकणार आहे. अश्या प्रकारे अपारंपरिक ऊर्जेचा वापर करत या क्षेत्रात स्वयंपूर्ण होणारे हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय आहे. 


इथले सोलर पॅनल बघितले की आपण एका महाविद्यालयाच्या आवारात आहोत हे सांगितले तरीही पटणार नाही. पण हेच तथ्य आहे. महाविद्यालयाचे महिन्याचे विजेचे बीले ही साठ ते सत्तर हजार रुपये इतके असते. पण सौर ऊर्जेचा वापर केल्याने आता महाविद्यलयाची बचत होणार आहे. नागपूरच्या या इमारतीत अश्या प्रकारे संयंत्र लावल्यानंतर आत या शैक्षणिक संस्थेच्या विदर्भातील इतर इमारतींमध्ये देखील अश्या प्रकारे सौर ऊर्जेचा वापर होणार आहे. 


या महाविद्यालयाने बसवलेले या संयंत्राच्या माध्यमाने पुढच्या २५ वर्षे वीज निर्माण होणार आहे. या संयंत्राची स्थापना करायला महाविद्यालयाला सुमारे २५ लाख रुपयांचा खर्च आला.  येत्या काळात राज्य सरकारकडून अश्या प्रकारे सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याकरता प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.  


सौर ऊर्जेचा अश्या प्रकारे वापर करणारे हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय आहे. अशा प्रकारे इतर महाविद्यालय आणि संस्थांनी प्रेरणा घेत हा प्रकल्प राबवला तर मोठ्या प्रमाणात विजेची बचत तर होईलच पण या सोबतच पर्यावरणाचे रक्षण देखील होईल.