मुंबई: उद्योजग व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र त्यासाठी लागणारं भांडवलं कुठून आणायचं? कसा उभा करायचा उद्योग असे अनेक प्रश्न असतात. एक शेतकऱ्याच्या मुलानं हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवलं आहे. नुसतं सत्यात उतरवलं नाही तर त्याला राष्ट्रीय पातळीवर एक चांगला दर्जा दिला. आजच्या मितीला पश्चिम महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावातून सुरू झालेला हा उद्योग देशातील अनेक शहरांमध्ये पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षाकाठी 2200 कोटींची उलाढाल यातून होते. एवढच नाही तर गुजरात, राजस्थानमध्ये देखील त्याला खूप मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योगसमूह म्हणून गेल्या दशतकात समोर आलेलं नाव म्हणजे सोनाई. काळ्या मातीतून सोनं उगवावं अशा शेतकऱ्यांच्या घरातील मुलानं हा उद्योग पै-पै जोडून उभा केला. नुसता उभा केला नाही तर आजच्या मितीला देशभरात सोनाई डेअरी प्रोडक्ट्स विकले जातात. 


दशरथ माने यांनी उद्योजक होण्याचं स्वप्न पाहिलं. केवळ 3000 हजार रुपयातून किराणामालातून छोटा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर उदड व्यापारी आणि त्यानंतर सोनाई डेअर सुरू करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवसा संघर्षमय तर आहेच पण तेवढीच तरुणांना प्रेरणादायी आहे. विष्णुकमार माने यांनी त्यांचा आणि त्यांच्या भावांसोबतचा सोनाई डेअरीचा हा प्रेरणादायी प्रवास मराठी लीडर्समध्ये सांगितला आहे, 


'इंदापूर तालुक्यातील रूई हे गाव आहे. तिथे आम्ही राहात होते. अत्यंत दुष्काळी गाव म्हणून हे ओळखलं जातं. गावातील 90 टक्के कुटुंब ही काम करून धान्य मिळेल तिथे जाऊन काम करायचे आणि उपजीविका करायचे. मोठे भाऊ दशरथ यांना आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांची सैन्य दलात निवड झाली. तिथे ते कामासाठी रूजू झाले. दशरथ दादा यांच्यात लहानपणापासून व्यापार करण्याचं कौशल्य अवगत होतं.' 


'वयाच्या 15 व्या वर्षी किराणा दुकानात कामाला सुरुवात केली. वारीमध्ये चहा-बिस्कीट, कामाच्या ठिकाणी जाऊन चिवडा विकण्याची कामं आम्ही सुरुवातीला केली. दशरथ दादा सैन्य दलात भरती झाल्यानंतर हातात दोन पैसे यायला लागले. त्यांनी आम्हाला रूई गावात शिफ्ट केलं. कुटुंबाची उपजीविका भागावी यासाठी काहीतरी काम हवं म्हणून पहिल्यांदा किराणा दुकानं सुरू करून दिलं. त्या दुकानात सर्व वस्तू मिळाव्यात हा आमचा अट्टाहास होता.'


या घटनेनं आयुष्याला मिळाली कलाटणी


'एका दिवशी 7 वाजता वारा आला. त्यामुळे दुकानावरचे पत्रे उडाले. त्यानंतर जो धो-धो पाऊस आला. त्यामध्ये दशरथ दादांनी आणलेल्या सामनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यावेळी फोनही नव्हते. दशरथ यांना आम्ही टपालाने कळवलं. त्यांना तार मिळताच ते तातडीने निघून आले. नुकसान मोठं होतं. त्यावेळी आमच्याकडे फार पैसेही नव्हते. त्यावेळी आम्हाला नामदेव नलावडे यांनी मोठी मदत केली.' 


'3 हजार रुपयात पुन्हा एकदा छोटंसं किराण्याचं दुकान सुरू झालं. त्यातून येणाऱ्या पैशांमधून उडद व्यावसाय सुरू केला. आम्ही तिथे लोकांना सुविधा दिल्या. योग्य हमीभाव दिला. त्यामुळे इंदापूर मार्केटपेक्षा जास्त आमच्याकडे आवक होती. आपलं घरचं दुकान आहे हे कायम तिथे येणाऱ्या शेतकऱ्याला वाटायचं. '


'किराणा आणि अडद दोन्ही व्यापार स्थिरावला. पुढचा टप्पा काहीतरी करायचा असं आम्हा भावांना वाटलं पण काय करायचं यावर चर्चा केल्यावर दुधाचा विषय आला. त्य़ावेळी लक्षात आलं की दूधाचे दर 6 महिन्यांनी बदलतात. पहिल्या 6 महिन्यात शेतकऱ्यांना पैसे मिळतात. तर दुसऱ्या 6 महिन्यात शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्या भागात रोजगार निर्माण व्हावा आणि तिथल्या शेतकऱ्यांसाठी फायदा व्हावा या उद्देशानं मग डेअर फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला.'


सोनाई नावामागची गोष्ट 


'सोलापूर आणि बारामती या रोडवर सोनमाथा नावाची टेकडी होती. त्य़ा टेकडीवरची जमीन आम्ही खरेदी केली होती. तिथे लाल माती होती. तिथे लाल माती असल्याने आणि सोनमाथा असल्याने सोनमाई नाव दिलं तर ते जास्त चांगलं होईल असं त्यावेळी आम्हाला वाटलं. '


व्यवसायाचं सूत्र


'2002 पासून जे पैसे जिथून मिळतील ते पैसे तिथेच खर्च करायचे हे सूत्र कायम ठेवलं. व्यवसायातील पैसा हा कामगार आणि सहकाऱ्यांचा आहे. प्लॅन्ट आणि दूध दोन्ही एकचा वेळी सुरू केलं. त्यामध्ये क्वालिटी कुठेही कॉम्प्रमाइझ केली नाही. या दुधाची हाताळणी नीट करणं महत्त्वाचं असतं. वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स उभे केले जिथून दूध गोळा करता येईल. त्याची माहिती शेतकऱ्याला त्याच वेळी दिली जाईल.'


रामदेव बाबा या गोष्टींनी प्रभावीत झाले


'रामदेव बाबांनी आमच्या प्लॅन्ट पाहिला. गोठा पाहिला आमची दूध संकलनाची पद्धत पाहिली. आम्ही नियोजन केलेल्या पद्धतीमुळे ते खूप प्रभावित झाले. त्यांनी गायीच्या तूपासाठी प्रोत्साहन दिलं. आजच्या घडीला सोनाईमध्ये बटर बनवण्याची कपॅसिटी 120 टन प्रति दिन आहे. तर 100 टन तूप बनवण्याची कपॅसिटी आहे. सिंगल लोकेशन अमूल नंतरचा सर्वात मोठा खासगी तत्वावरचा दूध संकलन प्रकल्प म्हणून सोनाईकडे बघितलं जातं'. 


विष्णुकुमार म्हणाले, 'आई-बाबा दोघंही माळकरी होते. एकत्र कुटुंब होते संस्कार आई-वडिलांचे चांगले होते. आमचं पहिल्यापासून धोरण आहे. व्यवसायातून जे पैसे येतात ते आपले नसतात. त्या व्यवसायातील काही पैसा आपला असतो. बाकी तो तिथे हातभार लावणाऱ्याचा आहे. कधीकधी तोटे येतात त्यामुळे आलेला पैसे जपून ठेवावा लागतो.' हा मोलाचा मंत्र विष्णुकुमार माने यांनी दिला आहे.