नागपूर : भारतातील अंतर्गत जलमार्गांमध्ये लवकरच 'हायब्रिड एरोबोट' चालताना दिसणार आहे. पाण्याशिवाय, दलदल व बर्फावरदेखील चालू शकणाऱ्या या हायब्रिड एरोबोटच्या प्रस्तावाचे रशियन कंपनीने आज नागपुरात नितीन गडकरी यांच्यासमोर सादरीकरण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशांतर्गत जलवाहतुकीची आवश्यकता लक्षात घेता केंद्रातर्फे अशाप्रकारच्या बहुआयामी पर्यायांचा शोध सुरू होता. याअंतर्गतच रशियानं कंपनीच्या हायब्रिड एरोबोटचा विचार सुरु आहे. मोटरचे इंजिन,विमानाचे पंख असलेल्या हायब्रिड एअरोबोट 80 किलोमीटर वेगाने पाण्यावर चालतात. या बोटींची निर्मिती नागपूरजवळ कोराडी येथे करण्यात येणार आहे. 


 हायब्रिड एरोबोट दलदलयुक्त, बर्फाळ क्षेत्र या अडथळ्यांवर मात करतही चालू शकतात शिवाय प्रवासी घेऊून जाण्याची क्षमताही जास्त असल्यानं प्रवाशांनाही स्वस्त दरात प्रवास करता येवू शकणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. या हायब्रिट एरोबोटमध्ये पेट्रोल, विद्युत आणि मिथेनॉलवरदेखील वापरल्या जाऊ शकता. अलाहाबाद येथे होणा-या  कुंभमेळ्यादरम्यान त्यांचा उपयोग होण्याची शक्यता आहे.