कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : या पाखरांनो, परत फिरारे असं म्हंटलंय ठाणे महापालिकेनं..... खास फुलपाखरांसाठी ठाणे महापालिकेनं एक उद्यान तयार केलंय.... आता या बागेत फुलं, मुलं, आणि फुलपाखरं यांचा मुक्त वावर असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिमेंटच्या जंगलांतून उडून गेलेली फुलपाखरं परत आलीयत.... त्यांनी परत यावं म्हणून ठाण्यात विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये पुढाकार घेतला तो ठाणे महापालिकेनं..... ठाण्यातल्या प्रमोद महाजन निसर्गउद्यानात हे खास फुलपाखरु उद्यान साकारण्यात आलंय..


फुलपाखरांसंदर्भातली माहितीही या उद्यानात लावण्यात आलीय. येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात आढळणारी जवळपास 160 विविध जातींची फुलपाखरं या उद्यानात आणण्यात आलीयत... फुलपाखरांसाठी विशेष झाडंही या उद्यानात लावण्यात आलीयत.  फुलपाखरांना लागणारी Nector, तसंच त्यांच्या अधिवासासाठी पोषक ठरणारी होस्ट प्लांटस अशी तीन ते चार हजार झाडं खास फुलपाखरांसाठी लावण्यात आलीयत. 



सध्या या फुलपाखरु उद्यानात डार्क पाल्म डार्ट, कमांडर, पेंटेड लेडी, कतॉमन ग्रास यल्लो, कॉमन सेलर, ब्ल्यू टायगर. लाईम टेल्ड, कॉमन मॉरमॉन, कॉमन जेझबेल,  कॉमन ब्ल्यू बॉटल, प्लेन टायगर अशा विविध जातीची फुलपाखरं पाहायला मिळतायत.


खुळखुळा, लिंबू, कडीपत्ता, झेंडू, कण्हर ,लॅंथना ,बाऊनिया ,बुरूंडी जास्वंद ,जाई जुई ,मोगरा ,कुंदा ,चाफा ,झीना आणि लिली अशा झाडांवर फुलपाखरांचा वावर जास्त असतो.... त्यामुळे ही झाडं आवर्जून लावण्यात आलीयत. लुप्त होत चाललेली फुलपाखरं जगावीत आणि लहान मुलांना फुलपाखरांच्या विविध जातींची माहिती व्हावी, यासाठी हे फुलपाखरु उद्यान तयार करण्यात आलंय. 


विशेष म्हणजे या फुलपाखरांना पाहून ताण दूर होतो, असं या उद्यानाला भेट देणारे सांगतात... फुलपाखरांसाठी ठाणे महापालिकेनं केलेल्या या कामाचं नक्कीच कौतुक.....