Special Mumbai Local Trains For Ganpati Visarjan : मुंबईत आता रात्रभर गणपती बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. रात्री उशीरा दर्शन करुन घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे तर्फे मध्यरात्री विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता मध्य रेल्वेने देखील जादा लोकल सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर दुसरीकडे अनंत चतुर्दशीला पाऊसही विश्रांती  घेणार आहे.. पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वे मार्गावर अनंत चतुर्दर्शीला मुंबई लोकल रात्रभर सुरू राहणार आहे. तर, रात्री अधिकच्या लोकलच्या 8 फेऱ्या असणार आहे. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर लोकल उपलब्ध असणार आहेत.  
मुंबईत रात्री बाप्पाचं दर्शन घेणा-या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वे जादा लोकल सोडणार आहे. आजपासून 18 सप्टेंबरपर्यंत 22 विशेष लोकल धावणार आहेत. गणेशभक्त रात्री उशिरापर्यंत गणरायाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतात. त्यांची सोय व्हावी यासाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय. मध्य आणि हार्बर लाईनवर विशेष लोकल धावणार आहेत.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सीएसएमटी-ठाणे-सीएसएमटी आणि सीएसएमटी-पनवेल-सीएसएमटी मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर, रविवारी मध्यरात्रीनंतर आणि मंगळवारी मध्यरात्रीनंतर या विशेष लोकल फेऱ्या असणार आहेत. 


विशेष लोकलचे वेळापत्रक


उत्सव काळातील विशेष लोकल फेऱ्या या 15, 15, 16, 17 आणि 18 सप्टेंबरच्या मध्यरात्री धावणार आहेत. 
सीएसएमटी ते कल्याण -  1.40 आणि 3.25
कल्याण ते सीएसएमटी - 12.05
सीएसएमटी ते ठाणे - 2.30
ठाणे ते सीएसएमटी - 1.00 आणि 2.00
हार्बर रेल्वे मार्गावर विसर्जनाच्या मध्यरात्रीनंतर म्हणेजच 17 आणि 18 सप्टेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 
सीएसएमटी ते पनवेल - 1.30 आणि 2.45 
पनवेल ते सीएसएमटी -  1.00 आणि  1.45