पुण्यात भीषण अपघात; भरधाव टेम्पोने 6 वाहनांना उडवले, अंगावर काटा आणणारा Video
Pune Accident News: पुण्यात भीषण अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने सहा वाहनांना उडवले आहे.
Pune Accident News: पुण्यातील पिरंगुडा घाटात भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने पाच दुचाकींनी धडक दिली आहे. या अपघातात सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी अपघाताची भीषणता तीव्र होती. या अपघाताचे सीसीटिव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती लागले आहे. (Pune Aciident CCTV Video viral)
पुणे मुळशी रोडवर पिरंगुट घाट उतारावरून पौडच्या बाजूला सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पोने धडक सात वाहनांना धडक दिली. अपघाताच सीसीटीव्ही झी 24 तास च्या हाती लागले आहे. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली असून आता याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. टेम्पोने सहा दुचाकी आणि एका चार चाकी वाहनाला धडक दिली आहे.
टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत गोविंद लाल या टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एका डॉक्टरांचाही समावेश आहे.
नाशिक शहरात बर्निंग कारचा थरार
नाशिक शहरात सारडा सर्कल भागामध्ये अचानक एका वाहनाने पेट घेतला आहे. गाडीतून धूर निघतात गाडीतला ड्रायव्हर आणि प्रवासी बाहेर पडले होते मात्र धुराचे आगीमध्ये रूपांतर झाल्याने कारने पेट घेतला आणि गाडी जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे जवान अगदी जवळ असतानाही वाहन वाचवू शकले नाहीत. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही.