कोल्हापूर : हॉकीमध्ये राज्यस्तरीय कामगिरी करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून तीन विदयार्थिनींचा लैगिक अत्याचार करणाऱ्या कोल्हापुरातल्या नराधम हॉकी प्रशिक्षकाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर इथल्या कोल्हापूर पब्लिक स्कूलचा हॉकी प्रशिक्षक विजय विठ्ठल मनुगडे असे त्याचं नाव आहे. विजय मनुगडे याला मरेपर्यंत जन्मठेपेसह एक लाख रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस आर पाटील यांनी आज ही शिक्षा सुनावली. मे २०१७ मध्ये कोल्हापूर येथील राजेंद्रनगर परिसरात बलात्काराची घटना घडली होती. आरोपी मनुगडेने शाळेतील सातवी आणि आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. यात मनुगडेने एका मुलीवर अत्याचारही केले होते. या प्रकारनंत चीड व्यक्त होत होती.


या घटनेप्रकरणी राजारामपूरी पोलिसांनी क्रीडा प्रशिक्षक मनुगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. या क्रीडा प्रशिक्षकाच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. क्रीडा प्रशिक्षक मनुगडे विरुद्ध चारही पीडित मुलींनी स्वतंत्रपणे फिर्याद दाखल केली होती. या चारही खटल्यांचा आज एकत्रितपणे निकाल देण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने क्रीडा प्रशिक्षक मनुगडे याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.