मार्च आणि एप्रिलमध्ये पार पडलेल्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली. यंदा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पार पडली. या परीक्षा पार पडल्यांनतर निकाल वेळेवर लागणार की नाही अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांना होती. यावर स्वत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावीचे निकाल लवकर लावू असे आश्वासन दिले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी आता निकालाची तारीख जाहीर केली आहे. या वर्षी शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्यामुळे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता होती. मात्र बोर्डाने अखेर यावर तोडगा काढत पेपर तपासणीचे काम पुर्ण केले.


यंदा साधारण 30 लाख विद्यार्थींनी दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिली आहे. दरवर्षी मे च्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा आणि मग जुनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागतो परंतू यंदा मात्र चित्र वेगळे असेल. 


- या तारखांना जाहीर होणार निकाल 
बारावीचा निकाल साधारण 10 जुनपर्यंत जाहीर करण्यात येईल, तर दहावीचा निकाल 20 जुनपर्यंत लावणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.