पुणे : दहावीच्या निकालाबाबत सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहावीचे निकाल १० जूनच्या आधी लागतील, अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. निकाल वेळेत लागावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं शकुंतला काळेंनी सांगितलं. दहावीचा निकाल १० जूनपर्यंत आणि बारावीचा निकाल ३१ मेपर्यंत लागेल असं बोर्डाकडून याआधी सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे बारावीचा निकाल ३० मे रोजी लागला. बारावीच्या निकालामध्ये ५.४८६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी १७.५१ लाख विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. १ मार्च ते २४ मार्चपर्यंत दहावीची परीक्षा झाली होती. मागच्यावर्षी ८९.५० टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा पास झाले होते.


या वेबसाईटवर पाहता येणार निकाल


mahresults.nic.in


maharashtraeducation.com


results.mkcl.org


या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्याबद्दलची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर हा निकाल तुम्हाला पाहता येईल. हा निकाल डाऊनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढच्या वापरासाठी डाऊनलोड केलेला या निकालाची प्रिंट काढावी लागणार आहे.