मोठा अपघतात, दोन एसटींची समोरासमोर धडक
St Bus Accident In Dapoli : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आज सकाळी दोन एसटींचा अपघात झाला. दोन एसटींची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
रत्नागिरी / मुंबई : St Bus Accident In Dapoli : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आज सकाळी दोन एसटींचा अपघात झाला. दोन एसटींची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवासी जखमी झालेत. तर एक बस चालक गंभीर जखमी झालाय.
एका एसटीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, आज सकाळी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एसटीने प्रवास करत होते. दापोली येथे दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात विद्यार्थी आणि महिला प्रवासी जखमी झालेत.
बोरिवली - दापोली एसटी दापोलीकडे येत असताना दापोलीकडून मुरतपूरकडे जाणाऱ्या दोन बसचा मौजे दापोली वळणावर समोरासमोर धडक झाली. दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे एका एस्टीचे स्टेरिंग लॉक होऊन बोरवली - दापोली एसटीचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
या सर्व जखमींना सरकारी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.