धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर पुरमेपाडा गावाजवळ एका एसटी बसला आयशर गा़डीने धडक दिल्यानं मोठा अपघात झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात बसच्या वाहकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर एक प्रवाशी जखमी झालाय. नाशिक-जळगाव ही एसटी बस रस्त्याच्या कडेला पंक्चर झाल्यामुळे उभी होती. 


धुळ्याच्या दिशेने जाणा-या आयशरने एसटी बसला जोरदार धडक दिली आणि बसच्या बाजूला उभे असलेल्या वाहक आणि प्रवाशांना चिरडले. 


अपघातानंतर आयशरचा चालक गाडी घेऊन फरार झालाय. धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.