मोठी बातमी । एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते मागे
ST bus strike : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मुंबई : ST bus strike : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम राहिल. मात्र, आम्ही पहिला टप्पा जिंकला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते मागे घेत आहोत, अशी घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली. (ST worker's agitation temporarily withdrawn)
विलिनीकरणाचा निर्णय येईपर्यंत वेतवाढीचा निर्णय सरकारने घेतला. हा आंदोलनाचा पहिला विजय आहे. दुसऱ्या बाजूला सरकारने सरकार एसटीकडे निधी वर्ग करून नियमित वेतन होणार आहे. विलिनीकरणाचा लढा सुरू असला तरी पहिला टप्पा जिंकलेला आहे. भविष्यात विलिनीकरणाची लढाई सुरूच राहिल. कामगार जेव्हा जेव्हा बोलवतील तेव्हा तेव्हा आम्ही जावू, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन कामगारांनी सुरू केलेले आहे.त्यांनी ठरवावे ते कधीपर्यंत चालवावे. मात्र, आझाद मैदानावरील आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे, अशी घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे.