बीड : एसटीने प्रवास (ST Travel) करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. एसटीचा (ST) प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस १५ मिनिटांहून अधिक वेळ थांबल्यास संबंधित बस चालक-वाहकावर होणार कारवाई होणार आहे. एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांकडे यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. दिलेल्या थांब्यांव्यतिरिक्त जर बस थांबवली तर कारवाई होणार, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही चालक-वाहक प्रवाशांना जेवणासह इतर सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून जास्त वेळ बस थांबवून ठेवतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विभाग नियंत्रकाला चालक-वाहकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांकडे यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. 


एसटी बसेससाठी लांबच्या प्रवासादरम्यान विविध थांबे निश्चित करण्यात आलेत. दिलेले थांबे याच्या व्यतिरिक्त जर गाडी थांबवली तर ही कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे एसटी थांबविताना वाहनचालक यांना विचार करावा लागणार आहे. जास्त वेळ एसटी एका थांब्यावर थांबणार नसल्याने एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कारण कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस  १५ मिनिटांहून अधिक वेळ थांबता येणार नाही. जर असा प्रकार उघड झाला तर बस चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.