सातारा :  driving talking on mobile : एखादे वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये असा RTOचा नियम आहे. मात्र, अनेक वेळा याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात पुढे आला आहे. वाई डेपोची एसटी मुंबईला जात असताना चालक चक्क वाहन चालवताना एका हातात मोबाईल घेत बोलत आहे आणि दुसऱ्या हाताने स्टेअरिंग, असे चित्र दिसून आले. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. (ST driver driving talking on mobile)


एका हातात स्टेअरिंग, एका हातात मोबाईल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यात एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, सुरु होता. साताऱ्यातील एका एसटी वाहकाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात हा वाहक मोबाईलवर बोलत एका हाताने बस चालवत आहे. अशा प्रकारे वाहन चालवताना गाडीवरील नियंत्रण सूट शकते किंवा अपघात होऊ शकतो. असे असताना चालक मोबाईलवर बोलाताना दिसून येत आहे. त्यामुळे मोबाईलवर बोलणे हे बसमधील प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया गाडीतील प्रवाशांनी दिली. जर अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


साताऱ्यातून मुंबईकडे येणारी ही एसटी वाई डेपोची असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईला जात असताना एका जागरुक प्रवाशाने हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात चित्रत केला आणि आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.