एसटी परीक्षा नियंत्रकाच्या मनमानीचा मराठी मुलांना फटका
एस टी महामंडळाच्या परीक्षा घेणाऱ्या खाजगी यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक मराठी मुले परिक्षेपासून वंचित राहिली आहेत. परिवहन मंडळाच्या विविध पदासाठी लेखी परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पत्रे आलीत. पण सुरक्षा रक्षकांनी अनेकांना परीक्षेलाच बसू दिले नाही. दुसरीकडे परभणीमध्येही अनेक परीक्षेला आलेल्या अनेक उमेदवारांचे नुकसान झाले आहे.
ठाणे : एस टी महामंडळाच्या परीक्षा घेणाऱ्या खाजगी यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक मराठी मुले परिक्षेपासून वंचित राहिली आहेत. परिवहन मंडळाच्या विविध पदासाठी लेखी परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पत्रे आलीत. पण सुरक्षा रक्षकांनी अनेकांना परीक्षेलाच बसू दिले नाही. दुसरीकडे परभणीमध्येही अनेक परीक्षेला आलेल्या अनेक उमेदवारांचे नुकसान झाले आहे.
परीक्षा सुरु होण्याची वेळ सकाळी ९ वाजता असताना, परीक्षा केंद्र असलेल्या खाजगी शाळेच्या सुरक्षा रक्षकाने सकाळी ८.१५ वाजतानंतर आलेल्या मुलांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला. त्यामुळे पालघर ठाणे व मुंबईच्या विविध उपनागरातून आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले, गेले महिनाभर परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना परीक्षा नियंत्रकाचा मनमानीचा फटका बसला आहे. आम्हाला फेर परीक्षेसाठी पात्र करावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
सुरक्षा रक्षक आणि नियंत्रकाच्या या दादागिरीमुळे अनेक मुलांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर याप्रकरणी काही कारवाई होते का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, परभणीमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सरळसेवा भरती २०१६-१७ अंतर्गत लिपीक-टंकलेखक कनिष्ठ पदासाठीची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं, त्यांच्याकडे पुरेशी संगणक यंत्रणाच बसवण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो परीक्षार्थींचं मोठं नुकसान झालं. यशवंत कॉलेज ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी येथे ऑनलाईन पद्धतीने परिक्षा आयोजित केली होती. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी असा गोंधळ उडाल्याने राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांची हेळसांड झाल्याचं बघायला मिळाली. तब्बल २ तास वाट बघूनही परिक्षा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ घालून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दुरून दुरून एक दिवस आधी मुक्कामी आलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागल्याने विद्यार्थ्यानी निषेध केला.