मुंबई : ST bus fare hike: एसटी महामंडळाने काल मध्यरात्रीपासून तिकीट दरवाढ केली आहे. इंधनाचे वाढते भाव आणि अनेक कारणे देत ही दरवाढ करण्यात आली आहे. दरम्यान, काही जिल्ह्यातून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. औरंगाबादकरांनी या दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महागला आहे. कारण एसटी महामंडळाच्या  17.17 टक्के भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे एसटीचा प्रवास किमान 5 रुपयांनी महाग होणार आहे. एसटीच्या पहिल्या सहा किलोमीटरच्या प्रवासासाठी ही दरवाढ करण्यात आली नसली, तरी त्यानंतरच्या एसटीच्या प्रत्येक टप्प्याला ही दरवाढ लागू असेल. Maharashtra State Regional Transport Corporation hike bus fare over 17 percent due to rising diesel costs )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक ते मुंबई प्रवास 40 ते 50 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर नाशिक - पुणे  प्रवासासाठी 55 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. रातराणीच्या सेवा मात्र अतिरिक्त दर रद्द करण्यात आल्याने 18 टक्के भाडेवाढ कमी झाली आहे.


जळगावहून मुबंई, पुणे, नाशिक कडे जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या जास्त आहे. जळगाववरून नाशिकला जायचे असेल तर आता 375 रुपये मोजावे लागणार आहेत. जळगाव- मुंबई 635 रुपये. जळगाव पुणे  600 रुपये द्यावे लागणार आहेत. दिवाळीच्या काळात मुंबई पुण्याहून अनेक नागरिक दिवाळीत गावाला जातात. त्यामुळे नक्कीच ही दरवाढ सर्वांना त्रासदायक, खिशाला कात्री लावणारी आहे.


मुंबई ते अलिबाग 30 रुपयांनी प्रवास महागला आहे. आता हा प्रवास 160 रुपये झाला आहे. मुंबई ते कोल्हापूर प्रवास आता 485 रुपयांवरुन 635 रुपये झाला आहे. औरंगाबाद ते लातूर हा प्रवास 360 रुपयांवरुन 420 रुपये महागला आहे. दरम्यान, मुंबई - पुणे शिवनेरी तिकीट दरार 75 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई-औरंगाबाद साध्या बसचे भाडे 120 रुपयांनी वाढले आहे. मुंबई-विजयदुर्गपर्यंत बसच्या भाड्यात 105 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.


एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड


दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून अडीच हजार रूपये मिळणार आहेत. अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये देण्यात येणार आहेत. तसेच महिन्याच्या 7 तारखेला होणारा पगार यंदा दिवाळीपूर्वी होणार आहे. त्यामुळे  93 हजारांहून अधिक कर्मचारी - अधिकाऱ्यांना लाभ मिळणार आहे.


नवी मुंबईत तिकीट दरात कपात 


तर दुसरीकडे नवी मुंबईतील शहर बस वाहतूक प्रवास स्वस्त झाला आहे. एनएमएमटीने वातानुकुलीत बसेसच्या तिकीट दरात कपात केली आहे. नवी मुंबईकरांना हे दिवाळी गिफ्ट आहे. साध्या बसमधून प्रवास करणाऱ्यांनाही सवलती देण्यात आल्या आहेत. प्रवासी संख्या वाढवण्यासाठी ही कपात करण्यात आली आहे. 


मध्य आणि पश्चिम रेल्वे वर 28 ऑक्टोबरपासून लोकलच्या 100% फेऱ्या सुरू होणारेत. मध्य रेल्वेवर 1702 फेऱ्या सुरु आहेत, त्या आता 1774 होतील. पश्चिम रेल्वेवर आता 1304 फेऱ्या चालवते त्यांची संख्या आता 1367 होणारेय. दोन डोस घेतलेल्याना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे.