मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी संप सुरू आहे. मात्र या एसटी संपाबाबत आताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एसटी संपात फूट पडल्याचं दिसत आहे. एकीकडे वेगवेगळ्या अडचणी आणि पगारवाढीसाठी कामगार संप करत आहेत. संपात सहभागी झालेल्या कामगारांचं निलंबन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या संपात फूट पडल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील 17 डेपोतून तब्बल 36 एसटी बसेस आतापर्यंत सोडण्यात आल्यात. त्यात सुमारे 822 प्रवासी होते. दरम्यान, जे कर्मचारी कामावर येतील, त्यांना संरक्षण देण्यात येईल. त्यांना अटकाव केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला.


इस्लामपूर वाटेगाव पहिली बस मार्गस्थ झाली आहे. पोलीस संरक्षणात गाडी बाहेर पडली आहे. अक्कलकोट आगार पहिली बस सुरू झाली आहे. अक्कलकोट ते सोलापूर,  सोलापूर ते अक्कलकोट अशी दोन ट्रीप झाली. यामध्ये साधारण 75 प्रवाशी होते.



एसटी कर्मचा-यांचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतून राज्यभरासाठी एसटी बसगाड्या सोडण्यास सुरूवात झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मुंबई सेंट्रल डेपोतून एसटी बसगाड्या रवाना करण्यात आल्या.


ST संपाचा राज्यभरात नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थ, रुग्ण सर्वांनाच वेगवेगळ्या स्तरावर फटका बसत आहे. एसटी कामगार आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यामुळे यावर तोडगा कधी निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.