ST Strike : संपाचा तिढा कायम, या एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
T employees strike : राज्यातील एसटी संपाचा तिढा सुटायला तयार नाही.
मुंबई : ST employees strike : राज्यातील एसटी संपाचा तिढा सुटायला तयार नाही. विलिनीकरणासाठी नेमलेली समिती आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आणखी काही बस सुरु झाल्याचा दावा एसटी महामंडळाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे रोजंदारीवरील एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली आहे. त्यानुसार 24 तासांत कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (ST Strike: Strike continues, show cause notice to these ST workers)
राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचारी संघटनांनी या बैठकीत घेण्यात आली आहे. त्यामुळे संपाचा तिढा सुटण्याऐवजी उलट वाढला आहे. दुसरीकडे संप मागे घेण्याचे आवाहन पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
दरम्यान, रोजंदारीवरील एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 24 तासांत कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे. 350 रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 24 तासांत कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. राज्यात सध्या सुमारे दोन हजार रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक, वाहकही आहेत.