नाशिक / पुणे : ST employees strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. राज्य सरकारने संप मागे घ्यावा असे आवाहन केले आहे. मात्र, कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, ही त्यांची मागणी कायम आहे. दरम्यान, पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भीक मागो आंदोलन सुरू केले आहे. तर पुणे आणि नाशिक येथून शिवनेरी, शिवशाही बस पुणे आणि मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भीक मागो आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनात एसटीचे विलिनीकरण करावे, ही मागणी करत एसटी कर्मचारी आपल्या मुलाबाळांसह सर्व आंदोलनाला बसले आहेत. एसटी कॉलनीमध्ये सर्वजण रस्त्यावरती उतरले आहेत. यावेळी थाळ्या वाजवत सरकारचा कुटुंबीयाकडून निषेध केला.


दरम्यान, खासगी भाड्याच्या शिवशाही बसवर खासगी चालकांची ड्युटी लावून या बस नाशिकवरून पुणे आणि मुंबईसाठी रवाना केल्या आहेत. संप मोडीत काढण्यासाठी प्रशासन आता भाड्याच्या शिवशाही बसेसचा आधार घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.


पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर आगारामधून खासगी शिवशाही बस सोडण्यात आल्या आहेत. प्रशासनाने खालीच शिवशाही बस सोडली आहे तरीही कोणीही गैरसमज करून घेऊ नये, हा प्रशासनाचा संप सुरू असा आरोप करण्यात येत आहे.


दरम्यान, एसटी महामंडळाकडून शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. कंडक्टर संपावर असल्याने अधिकारीच बुकिंग करत आहेत. कंत्राटी चालकांना घेऊन शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईसाठी शिवनेरी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. भाडे तत्वावर घेतलेल्या 2 शिवनेरी डेपोत लावल्या आहेत. नियंत्रककाकडून बुकिंग सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, यावर संपकरी कर्मचारी नाराज झाले आहेत.