मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत 2018-19 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याच्या दृष्टीने तरतूदी करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे..


- शाश्वत शेतीसाठी पाणी गरजेचे, म्हणून मागेल त्याला शेततळी, जलयुक्त शिवार, विहरी कार्यक्रा हाती घेतला


- ३११५ कोटी रुपयांची तरतुद पंतप्रधान सिंचन योजेनेसाठी, २६ प्रकल्प
- ८२३३ कोटी रुपयांची तरतुद जलसंपदा विभागासाठी


- पाटबंधाऱ्याचे ५० प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट


- जलयुक्त शिवार योजनेसाठी १५०० कोटी


- वनशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी १५ कोटी


- सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटी


- रोहयो अंतर्गत आंबा, काजूच्या फळबागांसाठी १०० कोटी रुपये


- कांदा प्रक्रियेसाठी ५० कोटी


- कर्जमाफी अंतर्गत आतापर्यंत ३५.६८ लाख १३६०० कोटी रुपयांचे वितरण


- ९३ हजार कृषीपंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी ७५० कोटींची तरतुद


- एसटी महामंडळाकडून शेतमाल वाहतुक सुरू करण्याची योजना 


- बसस्थानकांच्या पुनर्बांधणी व विकासासाठी ४० कोटी


- रेशीम विकास ३ कोटी