मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दसरा - दिवाळीच्या तोंडावर मोठी खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता महागाई भत्ता १३९ टक्क्यांवरून १४२ टक्के झालाय. १ ऑक्टोबर २०१८ पासून महागाई भत्त्यातील वाढ रोखीने मिळणार आहे.


१ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत या ९ महिन्यांच्या थकीत महागाई भत्ता देण्याबाबत सरकारनंतर निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


संबंधित बातमी


सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीत होणार मालामाल


राज्य सरकारचे कर्मचारी सातवा वेतन आयोग लागू होण्याची वाट पाहत असताना, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे.