दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानावे योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतलाय. ग्रामसमृद्धी योजनेला शरद पवारांचे नाव देण्यात येणार आहे. 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' या नावाने राज्य सरकार नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी दिली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शरद पवार हे राज्यासह देशातील राजकारणातील महत्वाचे प्रस्त आहे. कृषी, रोजगार अशा विविध क्षेत्रातील त्यांचा अभ्यास दांडगा आहे. येत्या १२ डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी सरकारने योजनेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतलाय. 


केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ही नवी योजना राज्य योजना म्हणून राबविण्यात येणार आहे.