बीड : राज्य सरकारने तूर आणि हरभरा खरेदीला मुदतवाढ न दिल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा हजारो हेक्टर माल उघड्यावर पडून आहे. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने माजलगाव बाजार समिती आवारातील तब्बल 19 हजार क्विंटल तूर आणि हरभरा भिजला.. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बीड जिल्ह्यात अकरा खरेदी केंद्रावरून तूर आणि हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरू होती.. मात्र सरकारने अचानक खरेदी बंद केल्याने शेतकरी हवालदिल झालेत. त्यातच मंगळवारी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. माजलगाव बाजार समितीच्या आवारात ठेवलेली 19 हजार क्विंटल तूर आणि हरभरा भिजून त्याला कोंब आलेत.