सिडकोची घरे लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय
सिडकोत राहणाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय.
नवी मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी 'पंतप्रधान आवाज योजने' अंतर्गत सिडको लवकरच तब्बल ७९ हजार ७७१ घरांची योजना राबवणार आहे. ही भव्य गृहप्रकल्प योजना तीन वर्षात पूर्ण केली जाणार असून तीन टप्य्यात पूर्ण करण्यात येणार आहे. या गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. या योजने अंतर्गत नवी मुंबईमधील तळोजा, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, वाशी तसंच ट्रक टर्मिनल्स आणि रेल्वे स्थानकाजवळच्या परिसरात ही घरे बांधण्यात येणार आहेत. सिडकोच्या घरांबाबत आणखी एक महत्वाची बातमी येत आहे. सिडकोत राहणाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय.
संपूर्ण मालकी घर धारकाला
सिडकोची मिळणारी घरे 99 वर्षे कराराच्या लीज ऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सिडकोत राहणाऱ्या नागरिकांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
या निर्णयामुळे संपूर्ण मालकी घर धारकाला मिळणार असल्याने नाशिकमधील घर धारकांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत.