महाराष्ट्रात उभारणार देशातील आधुनिक सायबर लॅब; नवी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Navi Mumbai News : नवी मुंबई येथ देशातील आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Cyber Lab In Maharashtra : नवी मुंबई पोलीस मुख्यालयात मद्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला. याचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीसांच्या हस्ते झालं. या कक्षात मुद्देमाल कक्ष ,रेकॉर्ड कक्ष, ई पेरवी कक्ष स्थापन करण्यात आलंय.. यामुळे न्यायालयात सादर करण्यात येणारे पुरावे सुस्थितीत ठेवण्यात येणार आहे. यावेळी नवी मुंबई मध्ये देशातील आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फणवीस यांनी केली.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेले मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष हे नवीन पध्दतीचं केंद्र आहे. महाराष्ट्रातले पहिले केंद्र असून पथदर्शी प्रकल्प आहे. यापुढे राज्यातल्या सर्व युनिटमध्ये असं केंद्र काढावं लागणार आहे. सर्व संहिता अनुरूप देशातलं पहिलं आयुक्तालय तयार झालं आहे. सर्व युनिट आणि सर्व आयुक्तालय अशीच तयार व्हावीत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवीन पनवेल येथे केले.
राज्यातला आधुनिक सायबर प्रोजेक्ट हाती घेतला आहे. भविष्यात डिजिटल ट्रान्झिशन वाढत आहेत त्यामध्ये चीनला मागे टाकलं आहे. त्यामुळे सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबईत देशातली आधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सर्व बॅंका, सोशल मिडिया अशी सर्व डिजिटल माध्यमं एका व्यासपीठावर आणली आहेत. इन्स्टाग्राम सारख्या सामाजिक माधयमावरून अंमली पदार्थाची खरेदी विक्री होत आहे. त्यात आपल्याला प्रवेश नाही. सामान्य माणसाचं व्यक्तिगत जीवन जपत अशा बाबींवर नियंत्रण आणावं लागेल. अशा बाबींना अटकाव करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. महाराष्ट्राने अमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स पॉलीसी सुरू केली आहे. ड्रग्ज विरोधात लढा द्यावा लागेल. त्यानुसार सर्व युनिटने कारवाई सुरू केली आहे. दुर्दैवाने पोलिस त्यात सामील दिसला तर 311 खाली बडतर्फ करायचा निर्णय घेतला असल्याचंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
गुन्हा सिध्द व्हावा यासाठी ज्या प्रकिया नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने तयार केल्या आहेत. त्यामुळे गुन्हा सिद्ध करण्यासाठी फायदा होईल आणि अटकाव वाढेल. जगामध्ये डीप टेक्नॉलॉजी वाढत आहे. यामध्ये कोणतीही छेडछाड करता येत नाही. नवी मुंबई पोलीसांनी सुरू केलेली पध्दत ही एक प्रकारे ब्लॉक चेनची पद्धत आहे. ज्यामध्ये १०० टक्के कोडिंग, ट्रॅकिंग आहे. जर यामध्ये कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर तो कोण आहे हे देखील लक्षात येते. पुराव्यांमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शोधताही येते. यामध्ये ए आय वर आधारित असलेली ब्लॉक चेनही सुरू करावी ज्यामुळे 100 टक्के या व्यवस्थेत छेडछाड करता येणार नाही असा सल्लाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिला.