मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाचे पहिले तीन दिवस शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचारावरून आक्रमक असलेल्या विरोधी पक्षाने अधिवेशनाचे कामकाज चालू दिले नव्हते. आज याच विषयावर विरोधी पक्षातर्फे विधानसभेत चर्चा उपस्थित करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे कॅगच्या अहवालात भाजपच्या काळातील घोटाळा समोर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कॅगचा अहवाल अधिवेशनात मांडण्याआधी त्यातील माहिती समोर आल्यामुळे भाजपचे नेते संतप्त झाले आहेत. याबाबात भाजपने आज अधिवेशनात हक्कभंग आणण्याचा इशारा दिला आहे.



कर्जमाफी 


राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली. 


राज्यात दोन दिवसांपूर्वी कर्जमाफी योजना सुरू झाली आहे. तीन महिन्यात ही कर्जमाफी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं.