अमरावती : आम्ही रक्त काढणाऱ्यांपैकी नाही तर रक्त देणाऱ्यांपैकी आहोत असे बच्चू कडू म्हणालेयत. कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्लाझ्मा दान केलंय. यानंतर ते बोलत होते. राज्यभरात कोरोना रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूच प्रमाण वाढत आहे. तर प्लाझा अभावी अनेक रुग्णांचा मृत्यूसुद्धा होतोय.  कोरोना रुग्णांना गंभीर परिस्थितीत प्लाझ्माची गरज असते. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारच्यावतीने प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येतंय. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्लाझ्मा दान केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाल्यावर त्याच्या शरीरात अँटी बॉडीज तयार झाल्या. त्यामुळे त्यांनी आज प्लाझा दान करत इतरांनी सुद्धा प्लाझा देण्यासाठी पुढं यावं असं आवाहन त्यांनी केलं. 


बच्चू कडू यांनी आतापर्यंत तब्बल 100 वेळा रक्तदान केलंय. आता 101 व्या वेळी त्यांनी आपला प्लाझा दान केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान करणारे एकमेव लोकप्रतिनिधी बच्चू कडू असल्याचे सांगितलं जातंय.



आतापर्यंत आमची रक्त देण्याचीच संकल्पना राहली. सध्या कोरोनामूळे प्लाझ्मासाठी अनेकांना वाट पाहावी लागत आहे. आणि आता माझ्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्याचे मला भाग्य मिळालं आहे. खरंतर कुणाला याची गरज लागावी अशी वेळ येऊ नये. जर दुर्दैवाने ती वेळ आलीच तर त्यांना देण्याची आमची तयारी सहभाग असला पाहिजे. त्यातून जीव वाचवण्यासाठीच लहानसे काम आम्ही केले आहे. असे बच्चू कडू म्हणाले.


ज्या रुग्णाला हा प्लाझा मिळेल त्याचा जीव वाचेल. अशी प्रार्थना करतो त्याचा गर्व आहे की त्याचा जीव वाचेल. आपली भूमिका ही नेहमी रक्त आणि प्लाझ्मा देणाऱ्यांपैकी असली पाहिजे. रस्त्यावर तलवार फिरवून जीव मारण्यापेक्षा रक्तदान करणाऱ्या युवकांची देशाला गरज आहे असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.