मुंबई : राज्य शिखर बॅंक कथित गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६९ जणांना दिलासा मिळालाय. यासंदर्भात ईडीने केलेली मागणी न्यायालयाने फेटाळलीय. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्ज वितरणाच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा मुंबई पोलिसांनी आपल्या अहवालात केला होता. त्यामुळे हे प्रकरण बंद करण्याचे मुंबई पोलिसांच्या अहवालात म्हटले होते. यामुळे उपमुख्यंत्री अजित पवारांसह (Deputy CM Ajit Pawar) ६९ जणांना दिलासा मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अहवालास विरोध करणारा अर्ज ईडीने विशेष न्यायालयात केला होता. पण विशेष न्यायालयाने हा अर्ज फेटाळलाय. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ईडीला आता या प्रकरणाचा तपास करता येणार नाही. 



दरम्यान, पोलिसांचा अहवाल स्वीकारायचा की नाही याबाबतचा अंतिम निर्णय मूळ तक्रारदाराचं संपूर्ण म्हणणं ऐकल्यावर देऊ, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय.